इतिहास ते वर्तमान



* विष्णुशास्त्री चिपळूणकर  , लोकमान्य टिळक , गोपाळ गणेश आगरकर,प्रा. नामजोशी या ध्येयवेड्या निष्ठावान व शिक्षणाविषयी तळमळ असणाऱ्या सुधारकांनी, देशभक्तांनी ४ जानेवारी १८८१ रोजी पुण्यात मोरोबादादांच्या प्रशस्त वाड्यात  महिना वीस रुपये भाडेतत्वावर न्यू इंग्लिश स्कूल हि शाळा सुरु केली   

* त्यानंतर १८९९साली सुरु झालेल्या लहान मुलांसाठीची आपली नवीन मराठी शाळा हि न्यू इंग्लिश स्कूलची शाखा अशी सुरवातीला ओळख होती. पण नंतर शाळेची लोकप्रियता वाढून विदयार्थी संख्येत वाढ झाल्यामुळे 'नवीन मराठी शाळेला 'स्वतंत्र शाळेचा दर्जा देण्यात आला. 

* शाळेला मोरोबादादांचा वाडा अपुरा पडू लागल्यावर तेथून गद्रे वाड्यात व नंतर काही काळ होळकर वाड्यात शाळा भरू लागली. महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच अण्णासाहेब हे शाळेचे पहिले शालाप्रमुख होते.

* प्रा. वा . ब . पटवर्धन , प्रा . गं. वा. लेले , प्रा. वि . ब . नाईक , प्रा . गो . चि . भाटे या शाळाप्रमुखांनी शाळेच्या विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. 

* इ . स . १९१४मध्ये प्रा. के. आर . कानिटकर हे शालाप्रमुख झाले . त्या वेळचे सरकारी अधिकारी लॉर्ड वेलिंग्टन  यांनी शाळेला १,२५,००० रु . देणगी दिली.प्रा. कानिटकरांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या या व इतर अनेक देणग्यांमधून १९१९ साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते शाळेच्या आजच्या इमारतीत कोनशिला समारंभ झाला . 

* सन  १९२१ मध्ये प्रा. वि . के. जोग हे शाळाप्रमुख झाले आणि १९२३ साली बांधकाम पूर्ण होऊन नवीन मराठी शाळा सध्याच्या  वास्तूत भरू लागली. प्रा. जोग यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या देणग्यांमधून १९२६ साली लेडी टाटा यांच्या हस्ते शाळेच्या नवीन सभागृहाचे उदघाटन झाले . 

*त्यानंतर शालाप्रमुख म्हणून काम करणाऱ्या प्रा. रा. पु. शिंत्रे व प्रा न. गो. सुरु यांनीही बालकेंद्रित अभ्यासक्रमांचा पाठपुरवठा केला. १९३२ मध्ये श्रीमंत प्रतापसिंह महाराजांकडून देणगी मिळवली व त्यातुन विध्यार्थ्यांसाठी `श्रीमंत सयाजीराव गायकवाड 'वाचनालयाची इमारत उभी केली. त्यांच्याच काळात १९३६ साली बालक  मंदिराची सुरवात झाली .त्यानंतरच्या काळात प्रा. श्री. रा. पारसनीस व श्री. पु . वि साने यांनी शालाप्रमुख पदाची धुरा समर्थपणे पेलली. दानशूर उद्योगपती श्री. चं . गो. आगाशे यांच्याकडून मिळालेल्या देणगीतून श्री. पु. वि. साने यांनिविदयार्थ्यांसाठी  पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी मोठं `पुष्करणी ' म्हणजेच `पांणघर ' उभारले. 
       दानशूर उद्योगपती श्री. चं गो. आगाशे यांच्याकडून मिळालेल्या देणगीतून श्री. पु. वि. साने यांनी विदयार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी करण्यासाठी मोठी 'पुष्करिणी ' म्हणजेच 'पाणघर ' उभारले. 
         वाचनालय व पुष्करिणी या इमारती पाडून २०१४ साली डे . ए. सोसायटीच्या NEMS या शाळेच्या इमारतीची पायाभरणी झाली. 
          १९६३ साली शालाप्रमुख झालेल्या  श्रीम. लीलाताई गोखले यांनी न्या. माधवराव रानडे यांच्या सुपुत्राकडून म्हणजेच डॉ. ना. भा . रानडे यांच्याकडून मिळालेल्या देणगीतून आजची न्या. रानडे बालक मंदिराची स्वतंत्र इमारत १९६५ साली बांधली. त्यांच्याच कारकिर्दीत १९७५ साली नवीन मराठी शाळेचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला. 
        डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे अनमोल मार्गदर्शन व पाठबळ तसेच अनेक शिक्षणतज्ञ व थोर विचारवंतांच्या भेटींमुळे शाळेची किर्ती जगभर पसरली.
वर्गातील सर्व विदयार्थ्यांच्या सहभागातून वार्षिक स्नेहसंमेलन हि ही कल्पना मा. लीलाताई गोखले बाईंनीच रुजवली . शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळेच १९७४ साली त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले गेले.  
       श्री. ना. ल . काळे , श्रीम. शैलजा पावगी, सौ. कल्पना आगवणे , सौ. उर्मिला उत्तेकर , सौ . पदमजा तपस्वी , सौ. मंदा अष्टेकर , सौ . सुप्रिया माजगावकर या मुख्याध्यापकांनी त्यांच्या धडाडी, कामाचा उरक , कल्पकता, नियोजनबद्धता इ . गुणांनी शाळा अधिकच नावारूपाला आणली.

1995 साली शाळेत ली पासून विदयार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे अध्यापन सुरु करण्यात आला. हा उपक्रम तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांनी नंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर राबवला. 

       मौखिक संस्कृत स्पोकन इंग्लिश हे हि शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत. 

        सध्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यपिका सौ. कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६ मध्ये शाळेने १२५६ विदयार्थ्यांसह 'गीत रामायण' संगीत नृत्य नाट्य रूपात सादर करून ' वर्ल्ड रेकॉर्ड ' प्रस्थापित केले. या अभिमानास्पद कामगिरीमुळे शाळेचा नावलौकिकाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेले आहे. 

       .ली ते थी च्या सर्व विदयार्थ्याना संगणकाचे प्रशिक्षण शाळेत दिले जाते . तसेच आधुनिक काळाची गरज ओळखून शाळेत उभारलेल्या - लर्निंग कक्षाचीही सर्व शिक्षक अध्ययन - अध्यापनासाठी वापर करतात. 

        शाळेच्या बागेत पिकणाऱ्या भाजीचे .थी च्या विदयार्थ्यांना वाटप केले जाते तसेच थी चे विदयार्थी शाडू मातीपासून छोटे गणपतीसुद्धा बनवतात. 

        बँड पथक , स्वस्तिक पथक , कब- बुलबुल पथक , शिक्षक - पालक,माता पालक संघ , गांडूळ खत इनोरा खत प्रकल्प , शैक्षणिक सहली क्षेत्रभेटी , मीना मंच ,मातीकाम क्रीडा मोहोत्सव , सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या विविध उपक्रमात विदयार्थी शिक्षक वर्षभर कार्यरत असतात. शिवचरित्र प्रश्नमंजुषा आणि शताब्दी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा हि तर शाळेची वैशिष्ठये आहेत. 

        शाळेतील हवेशीर मोकळे वर्ग , मोठे  फळे प्रशस्त मैदान , पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय स्वच्छ मुबलक स्वच्छतागृहे , स्वतंत्र चित्रकला वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, गणित कक्ष,माती काम वर्ग ,सुसज्ज ग्रंथालय , भरपूर शैक्षणिक साहीत्य खेळ साहित्य या सर्व सोयी- सुविधांमुळे विदयार्थी शाळेत रमून जातात शिष्यवृत्ती , ज्ञानांजन ,टि..वि. अशा विविध बाह्य स्पर्धा परिक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून शाळेचा मान वाढवतात. 

       बौद्धिक विकासाबरोबर विदयार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी अभ्यासक्रमातील शारीरिक शिक्षणाबरोबरच तायक्वांदो मल्लखांबाचेही प्रशिक्षण वर्ग शाळेत सुरु केले आहेत. 

       शाळेत उभारलेली पुणे शहराची प्रतिकृती म्हणजेच पुणे दर्शन प्रकल्प पाहण्यासाठी इतर शाळांचे शिक्षक विदयार्थीही आवर्जून भेट देतात. 

       अंतरवर्गीय आंतरशालेय सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन विदयार्थी जसे भरपूर बक्षीसे मिळवतात तसेच अनेक शिक्षकांनीही पुणे  महानगर पालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवला आहे. सुशीला जोशी,कल्पना आगवणे , सुनीता जोशी, संघमित्रा बेंगळे , जयश्री लेले, सुनीता आगाशे , कल्पना वाघ यांना लोकनायक यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. विमलाबाई परदेशी पुरस्कार , पार्वतीबाई जगताप पुरस्कार नेस्पा पुरस्कार . अनेक पुरस्कारांनी शिक्षक सन्मानित झाले आहेत. शाळेच्या  प्रभारी मुख्याध्यापिका सो. जयश्री भडकमकर यांना आदर्श शिक्षिकेचा राज्य पुरस्कार मिळाला तर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अश्या राष्ट्रीय पुरस्काराने मान लीलाताई गोखले , ताराबाई वैशंपायन , प्रतिभा पावगी कल्पना आगवणे या गौरवान्वित झालेल्या आहेत. 

     आजही १२४ वर्ष पूर्ण होऊन नावाप्रमाणेच नवीन असलेली , सतत नाविन्याचा शोध घेणारी उपक्रमशील शाळा यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे आणि भविष्यातही करत राहील असा आम्हांस सार्थ विश्वास आहे. 

                                    " इवलेसे रोप लावियले द्वारी 

                                     तयाचा वेलू गेला गगनावेरी . "