Welcome & Greetings!

सौ. कल्पना वाघ

  सुस्वागतम 

लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर , विष्णूशास्त्री चिपळूणकर, वामनराव आपटे , महादेव नामजोशी या थोर समाज सुधारकांनी राष्ट्रीय शिक्षणाच्या उद्देशाने स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची आमची आमच्या नवीन मराठी शाळेने दि. ४ जाने २०२३ रोज़ी शतकोत्तर रौप्य महोत्सवात पदार्पण केले आहे. ४ जाने, 2023 रोजी शाळेचा १२४ वा वाढदिवस साजरा झाला. हा सुवर्ण क्षण मी व आपण सर्वांनी याची देही याची डोळा अनुभवला, या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार आहोत याचा आनंद आणि सार्थ अभिमान वाटतो. 

      शनिवार पेठेत मोठ्या वृक्षांच्या छायेत विविध पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधत ही वास्तू उभी आहे. 

      शाळेत शाडू मातीचे मातीकाम , बागकाम, मौखिक संस्कृत , कलादालन , विज्ञान वर्ग, गणित प्रयोगशाळा, ई - लर्निंग , वाचनालय अशा समृद्ध सोयी सुविधा आहेत. "सर्वांसाठी चांगले व सर्वांगीण शिक्षण या उद्देशाने  शाळेतील सर्व शिक्षक अनेकविध उपक्रम राबवतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम , राष्ट्रीय दिन बाह्य स्पर्धा परीक्षा , स्नेहसंमेलन परिपाठ यातून मुलांमध्ये भावनिक व सामाजिक विकासाची मूल्ये रुजवली जातात. 

      " गीतरामायण " हे सर्वात मोठे धार्मिक महानाट्य १३ डिसेंबर २०१६ रोजी वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडिया आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंदवले गेले. 

       १२५ वर्ष होऊनही शाळेचे नवीन पण जपणारी ही न.म.शा काळाच्या प्रवाहाच्या दिशेने पावले टाकत काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपक्रमांची आखणी कर त आहे.  

अशी ही गौरवशाली वाटचाल करत असताना आगामी काळातही बदलती शासकीय धोरणे, समाजाची बदलती मानसिकता इ.आव्हाने पेलण्यासाठी व या स्पर्धात्मक काळात खंबीरपणे टिकून राहण्यासाठी शाळेची गौरवशाली अभिमानास्पद परंपरा पुढे नेण्यासाठी काही योजना शाळेच्या दृष्टिक्षेपात आहेत.

*सर्व वर्गांमध्ये स्मार्ट टीव्ही बसवणे .

*संगणक कक्षातील संगणकांची संख्या वाढून अदयावत करणे .

*आगामी काळाची गरज ओळखून, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी, नैसर्गिक इंधन स्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने शाळेत सोलर एनर्जी प्रकल्प व पालापाचोळ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस आहे. तसेच कायमस्वरूपी विज्ञान प्रदर्शनी, आपत्कालीन निधी उभारणे तसेच कला ,क्रीडा,विज्ञान या विषयांच्या अनुषंगाने भौतिक सोयी सुविधा व शाळा सुशोभीकरण करण्याचे योजिले आहे. आत्तापर्यंतची आपण पाहिलेली शाळेची गौरवशाली वाटचाल समाजातील विविध दातृत्ववान मंडळी व शाळेचे हितचिंतक यांच्या आधारावर शक्य झाली.

आपल्या ध्येयवेढ्या संस्थापकांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्दिष्टाने स्थापन केलेली न.म.शा ची द्विशतकी वाटचाल. हीच उज्वल परंपरा अखंडित राहण्यासाठी व भविष्यातूनही गरुडभरारीने झेप घेण्यासाठी ,आपल्यासारख्या दातृत्ववान व हितचिंतकांचा मदतीचा हात गरजेचा आहे. तो मदतीचा हात आम्हाला निश्चितपणे लाभेल ही खात्री आहे.

त्यासाठी आजी-माजी विद्यार्थी ,पालक ,शिक्षक मुख्याध्यापकांचे अनमोल सहकार्य लाभो .व सर्व विद्यार्थ्यांना शाला मातेचा हा आशीर्वाद असाच लाभो ही प्रार्थना एकी हेच बळ .

       आपल्या शुभेच्छा हेच आमचे पाठबळ ! 

                                धन्यवाद 
सौ. वाघ कल्पना
मा. मुख्याध्यापिका

Notice Board

आपल्या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आपापल्या कार्यक्षेत्रात अत्युच्य पदावर आहेत.शालामातेस यांचा अभिमान आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपली व आपल्या परिचितांपैकी असे जे असतील त्यांची माहिती कृपया भरावी.
शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात शाळेचे पदार्पण - बुधवार दि.०४.०१.२०२३
माजी विद्यार्थी व पालकांनी वेबसाईट वरील माहिती भरावी.
देणगीदारांना नम्र आवाहन या संदर्भात कृपया शाळेशी संपर्क साधावा.