Call us today 02067656819

  • name

Welcome & Greetings!

image_20181207090220.jpg

  सुस्वागतम 

लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर , विष्णूशास्त्री चिपळूणकर, वामनराव आपटे , महादेव नामजोशी या थोर समाजसुधारकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा उद्देशाने स्थापन केलेल्या 'डेक्कन एज्युकेशन सोसाटीची ' आमची ' नवीन मराठी शाळा. शाळेची शतकोत्तर रौप्यमोहोत्सवी वर्षाकडे वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. 

      शनिवार पेठेत मोठ्या वृक्षांच्या छायेत विविध पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधत ही वास्तू उभी आहे. 

      शाळेत शाडू मातीचे मातीकाम , बागकाम, मौखिक संस्कृत , कलादालन , विज्ञान वर्ग, गणित प्रयोगशाळा, ई - लर्निंग , वाचनालय अशा समृद्ध सोई सुविधा आहेत "सर्वांसाठी चांगले व सर्वांगीण शिक्षण या उद्देशाने  शाळेतील सर्व शिक्षक अनेकविध उपक्रम राबवतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम , राष्ट्रीय दिन बाह्य स्पर्धा परीक्षा , स्नेहसंमेलन परिपाठ यातून मुलांमध्ये भावनिक व सामाजिक विकासाची मूल्ये रुजवली जातात. 

      " गीतरामायण " हे सर्वात मोठे धार्मिक महानाट्य १३ डिसेंबर २०१६ रोजी वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडिया आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंदवले गेले. 

       शाळेच्या प्रगतीची , उपक्रमांची आपणास या वेबसाईटवर माहिती व क्षणचित्रे पाहावयास मिळेल. 

       आपल्या शुभेच्छा हेच आमचे पाठबळ ! 

                                धन्यवाद 




सौ. वाघ कल्पना
मा. मुख्याध्यापिका

Notice Board

आपल्या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आपापल्या कार्यक्षेत्रात अत्युच्य पदावर आहेत.शालामातेस यांचा अभिमान आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपली व आपल्या परिचितांपैकी असे जे असतील त्यांची माहिती कृपया भरावी.